नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद

मराठा आंदोलन नाशिक बंद,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.3) मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी एकत्र येत बंद पाळला. यासाठी सकाळी नाशिक शहरात मोर्चा काढत बंदचे अवाहन केले. याला मुख्य बाजार पेठेतील व्यापारी, दुकानदारांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली तर उपनगरीय भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर जिल्ह्यात रास्ता रोको, आंदोलने, मोर्चा काढत बंद पाळण्यात आला.

नाशिक शहरात पंचवटी, नाशिकरोड, पंचवटी, इंदिरानगर आदी भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सिडको बहुतांश व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. त्रिमूर्ती चौक, रायगड चौक, पवन नगर या ठिकाणी बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान, नाशिक शहरासह जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. खासगी वाहतूक तसेच महामंडळाच्या बसेस सुरू असल्याचे प्रवाशांची गैरसोय टळली.

चांदवड शहरातील व्यापारीवर्गाने दुकाने बंद ठेवली. शहरात शुकशुकाट होता. जनआक्रोश मोर्चानिमित्त शहरात अतिरिक्त पोलीस फोर्स बोलवण्यात आल्याने पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. अंदरसूल येथे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन झाले. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख झुंजारराव देशमुख, उपसरपंच संजय ढोले, डॉ. संकेत शिंदे, सभापती किसनराव धनगे आदींनी बंदसाठी अवाहन केले.

वणी येथे सापुतारा महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला. तसेच सपोनि निलेश बोडखे यांना निवेदन दिले. यावेळी मराठा महासंघ, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद appeared first on पुढारी.