नाशिक : जैन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवली चार्जिंग कार

चार्जिंग कार,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

येथील स्व. सौ. कांताबाई जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी जेएसपीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ताथवडे कॅम्पस, पुणेद्वारा आयोजित टेकथॉन २०२३ या राष्ट्रीय स्तरावरील कॅड सिम्पोजियम स्पर्धेत चार्जिंग कार बनवत दुसरा क्रमांक पटकावून यश संपादन केले.

डिझाइन अण्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिकल गोल्फकार्ट हे या प्रोजेक्टचे शीर्षक असून, या प्रोजेक्ट टीममध्ये ऋषभ विराणी, विश्वंभर रावळे, सौरभ पगार, दुर्गेश पाटील, सुशीलकुमार तिवारी, निशांत ठोके, यश पाटील, रामेश्वर गांगुर्डे, प्रजोल शिंदे, ज्ञानेश्वर निकम, शुभम थेटे, मुकेश देवरे, प्रियंका भामरे या यांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रोजेक्ट टीमला विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती, प्रा. आर. एम. सोनार, प्रा. डी. डी. संचेती यांनी मार्गदर्शन केले. तर प्रकल्प समन्वयक म्हणून प्रा. आर. एस. चौधरी यांनी काम पहिले. प्रोजेक्टसाठी इव्हिटेक गुजरात, अहमदाबाद यांचे तांत्रिक सहाय्य लाभले.

या गाडीची वैशिष्ट्ये

सहा व्यक्तींची आसन व्यवस्था; एका चार्जमध्ये ७५ ते ८० किलोमीटर चालते; जास्तीत जास्त स्पीड हा तासाला ४० किलोमीटर आहे; अतिशय आरामदायक व पर्यावरण अनुकूल व्यवस्था.

विद्यार्थ्यांची जॉबसाठी निवड –

प्रोजेक्टमध्ये चांगली कामगिरी केलेल्या ऋषभ विराणी, विश्वंभर रावळे, यश पाटील, सुशीलकुमार तिवारी या विद्यार्थ्यांची Focus Edumatics या बंगळुरूच्या नामांकित कंपनीत चांगल्या पॅकेजवर जॉबसाठी निवड झाली आहे. तर ज्ञानेश्वर निकम, प्रजोल शिंदे, यश पाटील यांची Ring Plus Aqua Limited या नामांकित कंपनीत तर शुभम थेटे, मुकेश देवरे, सुशीलकुमार तिवारी यांची Property Pistol या नामांकित कंपनीत निवड झाली. प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी, विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा : 

The post नाशिक : जैन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवली चार्जिंग कार appeared first on पुढारी.