नाशिक : टायर गोदामाला भीषण आग

टायर गोदामाला आग

दिंडोरी (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा

मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या जऊळके दिंडोरी एमआयडीसी परिसरात सिएट टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागण्याची घटना आज दुपारी घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.

आग कशामुळे लागली याबाबत कारण अद्याप कळू शकले नाही. नाशिक महानगरपालिका एचएएल आणि एअर फोर्स व पिंपळगाव ग्रामपंचायत यांच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. युद्ध पातळीवर आग विझविण्याचे काम सुरु आहे.

The post नाशिक : टायर गोदामाला भीषण आग appeared first on पुढारी.