Dhule : लहान आंबा खाण्यास दिला म्हणून फळविक्रेत्यास मारहाण

मारहाण.www.pudhari.news

पिंपळनेर (साक्री): पुढारी वृत्तसेवा

लहान आंबा खाण्यास दिला याचा राग येऊन फळविक्रेत्याला मारहाण करण्याचा प्रकार येथे घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वामन खैरणार (वय २९) आणि मित्र देवाजी वळवी यांचा भागीदारीत शहरातील सटाणा रोडवर फळाचे दुकान आहे. सायंकाळी संजु गांगुर्डे व राहुल पवार हे दोघे दुकानावर येऊन ते आंबे खाण्यास मांगु लागले. त्यांनी आंबे देण्यावरुन हुज्जत घालत शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी खैरनार यांना मारहाण केली. त्यातील संजु गांगुर्डे याने टोकदार वस्तु डोक्याला मारल्याने खैरनार यांना डोके फुटले. देवाजी याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करत दोघे पळुन गेले.

हेही वाचा : 

The post Dhule : लहान आंबा खाण्यास दिला म्हणून फळविक्रेत्यास मारहाण appeared first on पुढारी.