नाशिक : ‘त्या’ पत्रिकेची सगळीकडेच चर्चा, सोशल मीडियातही भडका

कांद्याचा अग्निडाग समारंभ,www.pudhari.news

नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील युवा शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांद्याला भाव नसल्याने उभ्या कांद्याला अग्निडाग संस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर डोंगरे यांच्या बाजूने प्रतिक्रियांची रासच उभी राहिली असून, सरकारला अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

याबाबतची कार्यक्रम पत्रिका तसेच वृत्त साेशल मीडियात व्हायरल होताच विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदारांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सदर बातमी फेसबुकवर शेअर केली आहे. तर लक्ष्मण हिरे या जालना जिल्ह्यातील नागठाण येथील तरुण शेतकऱ्याने शेरो- शायरीची मुक्त उधळण करत सरकारची कोंडी केली आहे. त्याच्या शायरीची एक क्लिपच व्हायरल होत असून काही तासांत ती हिट झाली आहे. कापूस पिकला अजून एकला कापसाने भरलं घर, आलं धोक्याचं सरकार लय खाजवते खरखर! अशी ओळी असलेली शायरी जनमानसात चांगलीच गाजत आहे.

शेतकऱ्यांनी आपली व्यथा चक्क ट्रॅक्टरवर शायरीच्या रूपाने मांडत शासनाचे डोळे उघडण्यासाठी नाना प्रकारे प्रयत्न केले आहेत. जालना जिल्ह्यातील कापूस पिकवणारे शेतकरी ट्रॅक्टरवरील आपल्या शायरीतून शासनाची कानउघाडणी करत आहे. 

-शाहीर लक्ष्मण हिरे…

हेही वाचा :

The post नाशिक : 'त्या' पत्रिकेची सगळीकडेच चर्चा, सोशल मीडियातही भडका appeared first on पुढारी.