नाशिक : त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री सप्तशृंगी देवी मंदिरात दीपोत्सव

सप्तशृंगी गड : पुढारी वृत्तसेवा;  आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील आदिमाया-आदिशक्तीचे स्वयंभू स्वरूप अर्थात माता सप्तशृंगी मातेच्या मंदिरात त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री भगवती मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रसंगी विश्वस्त संस्थेचे विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर व स्मिता पाटोदकर यांनी जोडीने श्री भगवतीची सांज आरती केली. प्रसंगी विविध रांगोळीकर व फुलांची सजावट करणारे कलाकार स्वयंसेवक तसेच पुजारी वर्गाने दिव्यांनी आकर्षक सजावट केली. स्थानिक ग्रामस्थ गणेश बर्डे व भाविक कमलाकर गोडसे आणि सहकारी यांनी आवश्यक तो समन्वय साधत पूर्तता केली.

सदर आकर्षक सजावट आणि दीपोत्सव करण्यात विश्वस्त संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांनी विशेष परिश्रम घेतले. मंदिर परिसरात विविध प्रकारच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठे रांगोळीचे नक्षीकाम केले होते. मंदिराच्या आतल्या भागात विविध प्रकारच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात दिव्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.

त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री भगवती मंदिरात झालेल्या आकर्षक फुलांची सजावट व दीपोत्सवामुळे मंदिर परिसरात एक भव्य आणि दिव्य असे वातावरण निर्माण झाले होते. या सजावटीमुळे मंदिराची शोभा वाढली होती आणि भाविकांना आध्यात्मिक आनंद मिळाला होता.

The post नाशिक : त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री सप्तशृंगी देवी मंदिरात दीपोत्सव appeared first on पुढारी.