नाशिक : त्र्यंबकमध्ये आंध्रचा पर्यटक मद्यपींच्या मारहाणीने जखमी

त्र्यंबकेश्वर,www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

ञ्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी आंध्र पदेशातून आलेल्या जयसूर्या ओब्लेस (20) या पर्यटकाला मंदिराच्या परिसरात फिरणाऱ्या तीन बेवडयांनी नाहक मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

जयसूर्या हा आई-वडील आणि बहिणीसह मंगळवारी दर्शनासाठी आला होता. शिर्डी येथून टुरिस्ट वाहनाने आलेले हे कुटुंब देवदर्शनासाठी उत्तर दरवाजाकडे आले असता अचानक पाठीमागून मद्यपान केलेले तीन युवक आले. त्यातील एकाने आपल्या हातातील धातूचे कडे जयसूर्याच्या डोक्यात जोरात मारले. त्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. त्याच्यासोबत असलेले त्याचे वयोवृध्द वडील आणि बहीण यांनी मद्यपींना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ते पळून गेले.

तेथे उभ्या असलेल्या रिक्षावाल्याने तातडीने जखमी युवकास उपजिल्हा रुग्णालयात आणले तेथे जखमेवर प्रथमोपचार केले. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. जयसूर्याच्या बहिणीने या तिघा मद्यपींचे मोबाइलमध्ये टिपलेले छायाचित्रे पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून मद्यपींकडून हल्ले वाढत चालले असून, ब्रह्मगिरीवर जाणाऱ्या भाविकांचे पैसे हिसकावून घेणे, जखमी करणे, वाहनांची नासधुस करणे असे प्रकार होत आहेत. यामुळे नाशिकची बदनामी होत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : त्र्यंबकमध्ये आंध्रचा पर्यटक मद्यपींच्या मारहाणीने जखमी appeared first on पुढारी.