नाशिक : दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध

अटक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंभीर गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शहर पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात वर्षभर स्थानबद्ध केले आहे. सचिन उर्फ घोड्या मधुकर तोरवणे (२७, रा. जुना सायखेडा रोड, जेलरोड) असे स्थानबद्ध केलेल्या संशयिताचे नाव आहे.

सचिनविरोधात शस्त्रांचा धाक दाखवणे, जबर मारहाण, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, वियनभंग, लूटमार, दंगल आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. उपनगर पोलिस ठाण्यासह, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, नारायण बापूनगर, लोखंडे मळा, दसक, जुना सायखेडा रोड, जेलरोड, नाशिकरोड परिसरात दहशत ठेवण्यासाठी सचिन गंभीर गुन्हे करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे त्याला ८ ऑगस्ट २०१९ ला वर्षभरासाठी एम.पी.डी.ए. कायद्यानुसार स्थानबद्ध केले होते. त्यानंतरही तो गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे आढळले. त्यामुळे शहर पोलिसांनी सचिनविरोधात पुन्हा एम.पी.डी.ए. कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्यानुसार त्याला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध appeared first on पुढारी.