नाशिक : देवळा येथे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

देवळा येथे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने मंगळवारी (दि. १८) रोजी किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडीओ विरोधात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अनेक कथित घोटाळे उघड करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओची सत्यता तपासण्याचे काम सुरू झाले असून, विरोधक आक्रमक झाले आहे. त्यांच्या समवेत असलेल्या महिलेची ओळख गुप्त ठेवण्यात आली असली, तरी या व्हिडिओमुळे त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारात सोमय्या यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात येऊन जोडे मारो आंदोलन करण्यात येऊन शासनाने त्यांच्याविरोधात कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले.

या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख सुनिल पवार, तालुका प्रमुख बापु जाधव, माजी तालुका प्रमुख अँड वसंत सोनवणे, शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, उप तालुका प्रमुख गणेश देवरे, उप तालुका प्रमुख वसंत सुर्यवंशी, उपशहर प्रमुख सोमनाथ शिंदे, गोरख अहिरे, भास्कर अहिरे, भाऊसाहेब आहेर, आदिवासी युवानेते गोविंद सोनवणे, विलास शिदे, विजय आहेर, खंडू जाधव, सतिष आहेर, जितेंद्र भामरे, बाबजी माळी, खुशाल देवरे, मोहन गोराणे, सुनिल साबळे, महेष जाधव, अशोक पवार, दादा सुर्यवंशी आदी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : देवळा येथे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो appeared first on पुढारी.