नाशिक : नॉयलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा

मांजा www.pudhari.news

सातपूर: पुढारी वृत्तसेवा

नॉयलॉन मांजामुळे सातपूरला दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. महादेवनगर येथील प्रवीण वाघ हा तरुण दुचाकीवरुन कामानिमित्त सातपूरच्या खोका मार्केटकडे जात असताना रस्त्यावर लटकत असलेल्या नॉयलॉन मांजाने त्याचा गळा चिरला आणि तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीेने खासगी रुग्णालयात नेले आणि तेथे डॉक्टरांनी आठ टाके टाकत त्याच्यावर उपचार केले आहे.

संक्रांतीचा सण येताच  या कालावधीमध्ये पतंग प्रेमींच्या उत्साहाला उधाण येते. बंदी असतानाही बाजारपेठेत सर्रास नायलॉन मांजा विकला जातो आहे. नॉयलॉन मांजाच्या वापरामुळे गळे कापले जाऊन जीवित हानी होणे किंवा जायबंदी होण्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. याचा सर्वात जास्त परिणाम पक्षांवर होतो. पक्षी मृत्युमुखी पडून निसर्गाचे खूप मोठे न भरून येणारे नुकसान  होत आहे. त्यामुळे या मांजाच्या वापरावर न्यायालयानेही बंदी घातली असून प्रशासनाने देखील याबाबत तातडीने लक्ष घालून नायलॉन मांजा विक्री व वापरावरती निर्बंध आणावेत तसेच पतंग उडवणाऱ्यांनीही पारंपरिक दोरा वापरून मांजाचा वापर टाळावा असे आवाहन नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : नॉयलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा appeared first on पुढारी.