नाशिक : पर्यावरणदिनी पांजरापोळमध्ये होणार 10 हजार वृक्षलागवड

पांजरपोळ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि. 5 जून रोजी चुंचाळे शिवारातील पांजरापोळच्या जागेवर 10 हजार वृक्षांची लागवड करण्याचा मानस शहरातील पर्यावरणप्रेमींनी शुक्रवारी (दि. 26) व्यक्त केला. यावेळी कॅन्डल मार्चला परवानगी नाकारणार्‍या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

शहरातील पर्यावरणप्रेमींनी एकत्रित येत 5 जून रोजी पांजरापोळ येथे 10 हजार वृक्ष लागवड करण्याची तयारी केली आहे. यानिमित्ताने जनजागृती करण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात येणार होता. मात्र, त्यास प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने सीबीएसजवळील हुतात्मा स्मारकात सायंकाळी बैठक घेतली. यावेळी पर्यावरणप्रेमींनी मेणबत्ती पेटवून प्रशासनाचा निषेध केला. पर्यावरणदिनी पांजरापोळमधील उपक्रमासाठी अधिकाधिक नागरिकांच्या समावेशासाठी जनजागृतीचा निर्णय घेतला. तसेच एकच लक्ष्य 10 हजार वृक्ष असा निर्धार व्यक्त करत उपक्रमाच्या जनजागृतीसाठी उपस्थितांना शपथ दिली. याप्रसंगी रमेश अय्यर, निशिकांत पगारे, जगबिर सिंग, भारती जाधव, कुलदीप कौर, दत्तू ढगे, चंदू पाटील, अमरीश मोरे, तुषार पिंगळे व सुमेध शर्मा यांच्यासह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नदी प्रदूषण, पर्यावरण संरक्षण व संवर्धन या संदर्भात उच्च न्यायालयाने आदेशित केले आहे की, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते. – निशिकांत पगारे, पर्यावरणप्रेमी.

हेही वाचा:

The post नाशिक : पर्यावरणदिनी पांजरापोळमध्ये होणार 10 हजार वृक्षलागवड appeared first on पुढारी.