नाशिक : पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन

Andolan www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क

पशुसंवर्धन विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ या संवर्गातील कर्मऱ्यांची पदे कमी करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी येथील अशोकस्तंभ पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन पुकारले आहे.

पशुसंवर्धन विभागातील लिपिकवर्गीय अधिकारी, कर्मचारी ज्यामध्ये वरिष्ठ प्रशासन अधिकारी गट अ, प्रशासन अधिकारी गट ब, अधिक्षक गट क तसेच गट ड मधील नाईक, दफ्तरबंद, शिपाई, परिचर, रात्रपहारेकरी, व्रणोपचारक गड यांच्या न्याय मागण्या, हक्कांसाठी काेणतेही प्रयत्न केले नसल्याने लिपीक वर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा पाठपुरावाच करण्यात आला नाही. तसेच भविष्यात देखील ही पदे कमी करण्याचे शासनाचे धोरण असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या सुधारीत आकृतीबंधाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडले आहे. काम बंद करुन मुंबई येथील आझाद मैदान येथे देखील कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ व राज्य कर्मचारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्यावतीने संपूर्ण काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाच्या पुती महसूल पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास विभागाचे राधाकृष्ण विखे पाटील यांना तसेच पशुसंवर्धन आयुक्त, सहआयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. कामबंद आंदोलनप्रसंगी वरीष्ठ लिपिक एस. सी. खर्डे, वरीषठ सहायक बाविस्कर, कनिष्ठ लिपिक सुरेखा शिंदे, परिचर हिंमतराव चव्हाण आदी मोठ्या संख्येने सहभागी होते.

हेही वाचा:

The post नाशिक : पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन appeared first on पुढारी.