नाशिक : बनावट बँक खाते उघडून उद्योजकास अडीच कोटींचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या नावे बँकेत बनावट खाते उघडून त्याद्वारे उद्योजकास २ कोटी ६२ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उद्योजकाच्या तक्रार अर्जावरून सातपूर पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

जगदीश मोतीलाल साबू (४४, रा. हिरावाडी, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अमोल जगन्नाथ पवार, भूषण दिलीप पवार, सागर शालीन पाटील, आकाश नामदेव वारुंगसे, नीरज मोहिनीराज खेडलेकर, देवेंद्र केदार शर्मा आणि विशाल पवार (सर्व रा. पंचवटी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी २३ नोव्हेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार केल्याचे समोर येत आहे. संशयितांनी साबू यांच्या कंपनीच्या व्यवहारातील रक्कम आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत साबू यांच्याच नावे बनावट खाते उघडले. त्यानंतर या खात्यामार्फत संशयितांनी त्यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहार करून साबू यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : बनावट बँक खाते उघडून उद्योजकास अडीच कोटींचा गंडा appeared first on पुढारी.