नाशिक : बसचालकास मारहाण करणाऱ्यास वर्षभर सश्रम कारावास

सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बसचालकास मारहाण करीत शासकीय सेवा बजावण्यात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने एकास वर्षभर सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ललित जनार्दन गावंडे (३८, रा. दत्तमंदिराजवळ, इंदिरानगर) असे या आरोपीचे नाव आहे.

ललित याने २५ फेब्रुवारी २०१२ रोजी माडसांगवी टोलनाक्याजवळ बसचालक शांताराम शिवराम महाले (रा. देवळाली गाव) यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात ललित विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस अंमलदार एस. पी. कडाळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. आर. वाय. सूर्यवंशी व आर. एम. बघडाणे यांनी युक्तिवाद केला. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी ललितला शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पी. व्ही. अंबादे, के. एस. दळवी यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

The post नाशिक : बसचालकास मारहाण करणाऱ्यास वर्षभर सश्रम कारावास appeared first on पुढारी.