नाशिक : बेघर बालकांना मिळतेय ओळख

बेघर पालक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत बेघर अर्थात रस्त्यावर राहणार्‍या बालकांसाठी 1 मे 2023 पासून बालस्नेही फिरते पथक हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरात हा प्रकल्प शिवसह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यामातून राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत शहरातील 11 ठिकाणांवरून 207 बालकांची माहिती संस्थेस संकलित केली आहे. या बालकांचे आधारकार्ड, वैद्यकीय तपासणी, शैक्षणिक प्रवेश, समुपदेशन व पुनर्वसन या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दरम्यान, महिला व बाल विकास विभाग, आधार सेवा केंद्र व शिवसह्याद्री संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार कार्ड शिबिराचे उद्घाटन विभागीय उपआयुक्त चंद्रशेखर पगारे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गणेश कानवडे, आधार सेवा केंद्राचे मुख्य प्रबंधक शंभु साह, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समिरा येवले, शिवसह्याद्री संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, प्रकल्प समुपदेशक मिलिंद घोडके, गोपाल चौधरी, माधुरी सोनवणे, सागर बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : बेघर बालकांना मिळतेय ओळख appeared first on पुढारी.