नाशिक : युवतीशी जातीवाचक संभाषण; तरुणाला अटक

Arrest

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

युवतीशी जातीवाचक संभाषण केल्याप्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी गोविंदनगर कर्मयोगीनगर परिसरात राहणाऱ्या सनी न्याहाळदे (२६) या युवकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संशयित सनी न्याहाळदे याने युवतीशी जातीवाचक संभाषण केल्यामुळे त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहेत. 

हेही वाचा :

The post नाशिक : युवतीशी जातीवाचक संभाषण; तरुणाला अटक appeared first on पुढारी.