नाशिक : रयत क्रांतीकडून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन,www.pudhari,news

अविनाश पाटील

येवला (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा 

भाजीपाला पिकाच्या दरवाढीविरोधात आंदोलन केल्याबद्दल काँग्रेसविरोधात रयत क्रांती संघटनेकडून बुधवारी (दि.26) निषेध आंदोलन करून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. सत्यगाव येथे रयत क्रांती संघटनेचे वाल्मीक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

काँग्रेसकडून टोमॅटो व भाजीपाल्याचे वाढलेल्या दराविरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत असून, या आंदोलनात काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करून निषेध केला. तसेच काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. एकतर शेतकऱ्याचा शेतमाल भाव नाही. थोडाफार भाव मिळत असल्याने काँग्रेसने वाढलेल्या भाजीपाला दराविरोधात आंदोलन छेडले आहे. गेल्या चाळीस वर्षांत काँग्रेसने भाजीपाला पिकाचे बाजारभाव वाढून दिले नाही. आता का विरोधात करतात, असा सवाल यावेळी सांगळे यांनी केला. यावेळी नवनाथ उगले, श्रीकृष्ण आव्हाड, संतोष पवार, विलास भवर, सूर्यभान आव्हाड, अंकुश आव्हाड, समाधान दराडे, सतीश माळी, अंकुश शिंदे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

हेही वाचा :

The post नाशिक : रयत क्रांतीकडून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.