नाशिक : लग्नात मानपान दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

विनयभंग ,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

लग्नात मानपान दिला नाही यावरून कुरापत काढून पती व सासरच्या चार जणांनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिलेचा विवाह दि. ३ जून २०१८ रोजी प्रतीक प्रकाश सोनाळीकर यांच्याशी झाला होता. त्यानंतर राणाप्रताप चौक येथील सासरी नांदत असताना पती प्रतीक सोनाळीकर, सासू आनंदी सोनाळीकर, सासरे प्रकाश सोनाळीकर, नणंद प्रांजली सोनाळीकर व सुधीर देशपांडे यांनी संगनमत करून विवाहितेला तुझ्या आईवडिलांनी जावयाला लग्नात मानपान दिला नाही, असे म्हणून विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला, तसेच तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेत स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. सततच्या छळाला कंटाळून पीडित विवाहितेने अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस हवालदार शेख करीत आहेत.

पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

घर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पती मुकेश खैरनार, सासू नंदा खैरनार, सासरे गोविंद गंगाराम खैरनार, दीर नितीन खैरनार, दिनेश खैरनार, उमेश खैरनार, जाव खुशाली दिनेश खैरनार (सर्व रा. यशराज पार्क, अभियंतानगर, कामटवाडा, नाशिक) यांनी संगनमत करून घर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेला शिवीगाळ केली, तसेच मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेतले. हा प्रकार दि. २१ मार्च २०२० रोजी विवाहितेच्या सासरी घडला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार शेख करीत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : लग्नात मानपान दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ appeared first on पुढारी.