नाशिक : लासलगाव ते पंढरपूर सायकल रॅलीतून पर्यावरणपूरक संदेश

लासलगाव www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढील वृत्तसेवा

येथील सायकलिंग असोसिएशनकडून सलग चौथ्या वर्षी लासलगाव ते पंढरपूर सायकल रॅली आयोजित केली असून, या रॅलीत पर्यावरणपूरक संदेश दिले जाणार आहेत.

अनिल ब्रम्हेचा www.pudhari.news

सायकलिंग असोसिएशन लासलगाव ते पंढरपूर सायकलने वारी करत आहे. यात प्रामुख्याने पर्यावरण बचाव व जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संदेश गावोगावी दिला जातो. – अनिल ब्रह्मेचा, अध्यक्ष, लासलगाव सायकलिंग असोसिएशन

यंदा असोसिएशनचे 20 सदस्य 352 किलोमीटर अंतर तीन दिवसांत पूर्ण करणार असून, या रॅलीमध्ये पर्यावरण बचाव या सोबतच Live-Green, Love-Green ,Think-Green हा प्रमुख संदेश देणार आहे. गुरुवारी (दि .15) सायंकाळी 5.30 ला येथील दत्त मंदिरात कार्यक्रमाला सुरुवात केली. लासलगाव स्विमिंग ग्रुप व लासलगाव डॉ. असोसिएशनने रॅलीतील सहभागींचा सत्कार केला. रॅलीत अनिल ब्रह्मेचा, संजय पाटील, सुनील ठोंबरे, रियाज शेख, डॉ. अनिल ठाकरे, संजय कदम, तुषार लोणारी, डॉ. उत्तम रायते, दगू नवले, अरुण थोरे, विजय वैद्य, ऋषी जेजूरकर, अशोक शिंदे, महेश वर्मा, डॉ. किरण निकम, डॉ. सुनील चव्हाण या रॅलीत सहभागी झाले आहेत. शुभेच्छा देण्यासाठी संतोष पलोड, राजेंद्र राणा, मुकुंद होळकर, डॉ. कैलास पाटील, गुणवंत होळकर, डॉ. भाऊसाहेब रायते, अरुण भांबारे, नटवर डागा, डॉ. प्रणव माठा, डॉ. संगीता सुरसे, अजय अग्रवाल, सागर थोरात, डॉ. युवराज पाटील, अनिल गवळी आदी उपस्थित होते. डॉ. अनिल बोराडे यांनी सूत्रसंचालन केले.

सुनिल ठोंबरे www.pudhari.news

लासलगाव ते पंढरपूर सायकलने वारी करण्याचे हे माझे दुसरे वर्ष आहे. यातून जीवनात खूप सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्रुपच्या वतीने विशेष प्रयत्न केले जातात. – सुनील ठोंबरे, सदस्य, लासलगाव सायकलिंग असोसिएशन.

हेही वाचा:

The post नाशिक : लासलगाव ते पंढरपूर सायकल रॅलीतून पर्यावरणपूरक संदेश appeared first on पुढारी.