नाशिक “लॉजिस्टिक हब’ म्हणून विकसित व्हावे : छगन भुजबळ

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये असलेली कृषी बाजारपेठ, ट्रान्सपोर्ट उद्योगाच असलेले मोठे जाळे आणि रस्त्यासह उपलब्ध पायाभूत सुविधा बघता नाशिक हे येणाऱ्या काळात ‘लॉजिस्टिक हब’ म्हणूनही विकसित झाले पाहिजे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या ऑटो अॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पो व फूड फेस्टिवलचा समारोप शनिवारी (दि.28) त्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी, महेश हिरे, अध्यक्ष राजेंद्र फड, कार्यकारी अध्यक्ष पी.एम.सैनी, सेक्रेटरी शंकर धनावडे, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, बजरंग शर्मा, सुभाष जांगडा, जे.पी.इंदोरिया, सुनील बुरड, जे.पी.जाधव, संजय तोडी, रामभाऊ सुर्यवंशी, महेंद्रसिंग राजपूत, एच.एन.अग्रवाल, एम.पी.मित्तल, कृपाशंकर सिंग, दलविर प्रधान, विजय लहामगे, सुनील जांगडा, भगवान कटिरा, दलजीत मेहता, राजेश शर्मा, सदाशिव पवार, टीसीआयचे मिश्रा, निटस मिडियाचे नितीन भोसले यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, ट्रान्सपोर्ट संघटनेने चालक सुविधा केंद्र उभारण्याच्या उद्देशाने उचलेले पाऊल कौतुकास्पद आहे. अगदी सायकल पासून ते महाकाय ट्रेलर पर्यंतच्या वाहनांचा या एक्स्पोत समावेश केला. या माध्यमातून या उद्योगाची व्यापकता नाशिककरांनी अनुभवली. तसेच आयोजित रोजगार मेळाव्यातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या हे या एक्स्पोचे यश आहे. ते म्हणाले की, ट्रान्सपोर्ट हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. चालक हा अतिशय महत्त्वाचा घटक असताना तो नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. अतिशय कठीण परिस्थितीत तासनतास रस्त्यावर काम करतो. अपघात झाल्यास त्यांना रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाही अशी खंत व्यक्त केली.

प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न

शहराच्या औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल, अडगाव ट्रक टर्मिनलचा विकास व शहरातील चारही प्रवेश द्वारांवर ट्रक टर्मिनल विकसित करण्याची संस्थेची मागणी आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले. आडगाव ट्रक टर्मिनलमध्ये चालक सुविधा केंद्र निर्माण करण्याचा संस्थेचा उद्देश ठेऊन संस्थेने हा अभिनव उपक्रम राबविला. या चालक सुविधा केंद्राच्या माध्यमातून चालकांना आरोग्य सुविधा, उपहार गृह, स्वच्छता गृह, रेस्ट रूम, गॅरेज, पेट्रोल पंप विकसित करण्यात येत आहे. हे चालक सुविधा केंद्राचे मॉडेल आदर्श ठरेल असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते बेरोजगार युवकांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. 

हेही वाचा :

The post नाशिक "लॉजिस्टिक हब' म्हणून विकसित व्हावे : छगन भुजबळ appeared first on पुढारी.