नाशिक : सहा वर्षांपासून फरार आरोपीच्या अखेर आवळल्या मुसक्या

आरोपी गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयात हजर न होता फरार झाल्यानंतर त्यास सहा वर्षांनंतर गुन्हे शाखेने पकडले आहे. नीलेश विनायक कोळेकर असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. कोळेकर याच्याविरोधात २००९ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे.

तो जामिनावर असताना न्यायालयात हजर होणे बंधनकारक होते. मात्र, कोळेकर हा न्यायालयात हजर होत नव्हता. त्यामुळे सरकारवाडा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला असता गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कोळेकर यास शनिवारी (दि.२७) पकडले. त्यास सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार नाझीम पठाण, विशाल देवरे, विशाल काठे, आप्पा पानवळ, संजय राठोड, सुरेश माळोदे, शरद सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

पोलिसांनी केलेल्या तपासात निलेश कोळेकर हा गुजरातमध्ये रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत असल्याचे समोर येते आहे. त्यामुळे पोलिसांनी अधिक माहितीसाठी गुजरात पोलिसांशी संपर्क साधण्याची तयारी केल्याचे समजते.

हेही वाचा :

The post नाशिक : सहा वर्षांपासून फरार आरोपीच्या अखेर आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.