नाशिक : विभागातील ३९ नायब तहसीलदारांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महसूल विभागात खांदेपालट सुरूच असून शासनाने नुकत्याच नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात विभागातील ३९ नायब तहसीलदारांचा समावेश आहे.

चालू महिन्याच्या प्रारंभी महसूल विभागात बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. सर्वप्रथम उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या. त्यानंतर तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या. मध्यंतरीच्या काळात बदल्यांना काहीअंशी ब्रेक लागल्याने अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मात्र, दोन दिवसांपूर्वी शासनाने नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. शासनाचे सहसचिव श्रीराम यादव यांच्या स्वाक्षरीने बदल्यांचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये नाशिक महसूल विभागातील पाचही जिल्ह्यांतील ३९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदली झालेल्यांमध्ये सर्वाधिक अधिकारी हे नाशिक जिल्ह्यातील आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या नवीन पदस्थापनेवर तातडीने रुजू व्हावे. दिलेल्या मुदतीत अधिकारी कामावर रुजू न झाल्यास त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्य दिन समजण्यात येईल. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा आदेशात देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या बदलीच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर पडकला आहे. सोमवारी (दि. २९) त्यांच्या बदलीचे आदेश निघतील, अशी शक्यता महसूल विभागात वर्तविली जात आहे. गंगाथरन डी. यांच्या जागेवर नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ रघुनाथ गावडे, सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी, पुणे जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद, राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजेंद्र क्षीरसागर व धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : विभागातील ३९ नायब तहसीलदारांच्या बदल्या appeared first on पुढारी.