नाशिक : विशेष पोलिस पथकाकडूनच नियमांचे उल्लंघन

वणी www.pudhari.news

नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा
भररस्त्यात पोलिस गाडी उभी करून विशेष पोलिस पथकाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनचालकांना बोलावून घेत चौकशी करण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे.

वणी-कळवण-सापुतारा हा महामार्गाचा भाग असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावर आहे. बेशिस्त वाहतुकीला आळा घालणे महत्त्वाचे असले तरी विशेष पोलिस पथक भररस्त्यात मध्यभागी वाहन उभे करून चौकशी करत होते. वणी- कळवण-सापुतारा रस्त्यावर कांद्याच्या ट्रॅक्टरची सतत वाहतूक सुरू असते. अनेकदा ट्रॅक्टरचालक बेशिस्तपणे वाहने चालवतात. तसेच वणी-सापुतारा महामार्गावर असलेल्या बाजार समितीत कांदा लिलाव झाला की, आपले ट्रॅक्टर वेगात रस्त्यावर चालवत नंबर लावण्याची धावपळ सुरू होते. बेशिस्त वाहतुकीवर कारवाई केली पाहिजे, परंतु पोलिसच जर नियम धाब्यावर बसवत असेल तर याला आळा घालायचा कोणी? असा सवाल नागरिक करत आहे. हे विशेष पथक अनेक ठिकाणी फिरतीवर असते रस्त्यात वाहने अडविणे,विनाकारण चौकशी करणे हे नेहमीच झाले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : विशेष पोलिस पथकाकडूनच नियमांचे उल्लंघन appeared first on पुढारी.