नाशिक : ‘शासन आपल्या दारी’साठी शहरात बसेसचे ५८ पिकअप पॉइंट

सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर शनिवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी शहरातील सहाही विभागांत सिटीलिंक बसेसचे ५८ पिकअप पॉइंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिटीलिंकच्या दीडशे बसेसच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणे व परत सोडण्याचे काम केले जाणार आहे.

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम), पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, समाजकल्याण, महिला व बालकल्याण अशा महापालिकेच्या विविध विभागांतील लाभार्थ्यांना सिटीलिंक बसेसच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी आणले जाणार आहे. प्रत्येक बससाठी दोन संपर्कप्रमुख असणार आहेत. बस क्रमांकासह संपर्कप्रमुखाचे नाव, मोबाइल नंबर बसवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी मनपाने दिलेल्या पिकअप पॉइंटवर शनिवारी (दि.१५) सकाळी ९ वाजता हजर राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विभागनिहाय पिकअप पॉइंट संख्या

नाशिक पूर्व – १०

नाशिक पश्चिम – ८

पंचवटी – १५

नाशिकरोड – ९

नवीन नाशिक (सिडको) – ८

सातपूर – ८

विभागनिहाय पिकअप पॉइंट…

नाशिक पूर्व

इंदिरानगर कॅनॉल रोड, उपनगर मनपा दवाखाना, समतानगर, वडाळागाव, द्वारका, बजरंगवाडी, उपनगर नाका, शिवाजी चौक-जुने नाशिक, म्हसोबावाडी, पंचशीलनगर.

नाशिक पश्चिम

रविवार कारंजा-चांदीच्या गणपतीजवळ, शालिमार, शिवाजी गार्डन-सुरुची हॉटेलसमोर, अशोक स्तंभ, भद्रकाली रिक्षा स्टॉपजवळ, उंटवाडी सिग्नल, शिंगाडा तलाव, रोकडोबा पटांगण.

पंचवटी

मखमलाबाद, म्हसरूळ, नांदूरगाव, नवनाथनगर, पंचवटी मनपा विभागीय कार्यालय, फुलेनगर, हिरावाडी, मानेनगर, गणेशवाडी, निमाणी, रामवाडी, कुमावतनगर, बोरगड, अवतार पॉइंट, आडगाव.

नाशिकरोड

चेहडी-सामनगाव-सिन्नर फाटा, बिटको-छत्रपती शिवाजी पुतळा, वडनेरगाव-वडनेरफाटा, विहितगाव-देवळालीगाव, मनपा विभागीय कार्यालय-मुक्तिधाम, जयभवानी रोड, केएनके शाळा-भीमनगर-पवारवाडी, सैलानी बाबा स्टॉप-नारायण बापूनगर, शनिमंदिर-राजराजेश्वरी-जेलरोड.

नवीन नाशिक (सिडको)

उत्तमनगर, शिवाजी चौक, लेखानगर, पिंपळगाव खांब, त्रिमूर्ती चौक, मोरवाडी, पाथर्डी फाटा, पवननगर बसस्टॉप.

सातपूर

म्हाडा कॉलनी, कांबळेवाडी, सातपूर मनपा विभागीय कार्यालय, चुंचाळे-घरकुल, दत्तनगर-चुंचाळे शिवार, केवळ पार्क, कार्बननाका-शिवाजीनगर, भवर टॉवर-शिवाजीनगर.

हेही वाचा :

The post नाशिक : 'शासन आपल्या दारी'साठी शहरात बसेसचे ५८ पिकअप पॉइंट appeared first on पुढारी.