नाशिक : शासन आपल्या दारीसाठी वाहतुकीचे नियोजन

शासन आपल्या दारी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे वाहनतळ, वाहतूक मार्गात बदल व बॅरिकेडिंगचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यक्रम स्थळाजवळील परिसरात चार ठिकाणी बॅरिकेडिंग असून, तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. तसेच बसेस, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी शहरातील सात ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत व सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.१५) होणाऱ्या कार्यक्रमासाठी सुमारे दोन हजार चारचाकी, ६०० बसेस येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचप्रमाणे दुचाकीवरूनही नागरिक येतील. त्यामुळे कार्यक्रम असलेल्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहनतळाची व वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी सहा ते कार्यक्रम संपेपर्यंत काही मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद राहणार आहेत.

बसेस पार्किंग ठिकाणे

– त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदान

– श्रद्धा लॉन्स, कोशिरे मळा

– बाजार समिती मार्केट, पेठ रोड

चारचाकी वाहन पार्किंग

– के. टी. एच. एम. कॉलेज, गंगापूर रोड

– बी. वाय. के. कॉलेज, कॉलेजरोड

दुचाकी वाहन पार्किंग ठिकाणे

– रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड

– बी. वाय. के. कॉलेज, कॉलेजरोड

बॅरिकेडिंग पॉइंट

– मॅरेथॉन चौक, गंगापूर रोड

– चोपडा लॉन्स, आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग

– आहिरराव फोटो स्टुडिओ, कॅनडा कॉर्नर

– ठक्कर बंगला, पंडित कॉलनी

वाहतुकीसाठी बंद केलेले मार्ग

– मॅरेथॉन चौक ते गंगापूर नाका सिग्नल

– गोल्डन जिम ते ठक्कर बंगला

– जुना गंगापूर नाका सिग्नल ते आहिरराव फोटो स्टुडिओ

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

– गंगापूररोडकडून अशोकस्तंभाकडे जाणारी वाहतूक जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, आ. देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानासमोरून मॅरेथॉन चौक व तेथून अशोकस्तंभाकडे जातील.

– अशोकस्तंभाकडून येणारी वाहने मॅरेथॉन चौक डावीकडे वळून जुनी पंडित कॉलनीमार्गे राणे डेअरी व इतरत्र जातील.

– गंगापूर रोडकडे जाणारी वाहने कॅनडा कॉर्नर कॉलेजरोडमार्गे इतरत्र जातील.

बसेसकरिता ईदगाह मैदान त्र्यंबक रोड येथे वाहनतळ असून, या बसेस ईदगाह मैदान, मोडक सिग्नल, सीबीएस, मेहर सिग्नल, अशोक स्तंभाकडून गंगापूर रोडने मॅरेथॉन चौक ते कार्यक्रमस्थळी (डोंगरे वसतिगृह मैदान) येतील. तर गंगापूर नाका गंगापूरोड मार्गे जेहान सर्कल, भोसला टी पॉइंट, महात्मानगर, एबीबी सर्कल, त्रंबकरोडने ईदगाह मैदान येथे जातील. तर सिटीलिंक बससाठी ठक्कर डोम येथे वाहनतळ उभारण्यात आले आहे.

The post नाशिक : शासन आपल्या दारीसाठी वाहतुकीचे नियोजन appeared first on पुढारी.