नाशिक : 564 कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती; कामगार कल्याण मंडळाची योजना

स्कॉलरशीप www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र सिन्नरमार्फत विविध आस्थापनांमध्ये काम करणार्‍या कामगार पाल्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असतात. यावर्षी 564 पाल्यांना शिष्यवृत्तीसाठी 17 लाख 34 हजार एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

कामगार पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक, एम.एस.सी.आय.टी., कुटुंबातील आजारपणासाठी अशा विविध योजना राबविल्या जातात. त्याच धर्तीवर कामगार कल्याण केंद्र सिन्नरमार्फत 2022 व 23 या वर्षातील सर्व कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक, एम.एस.सी.आय.टी., आजारपणाचे सर्व अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख अनिल बोरसे यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. कामगार पाल्यांना कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या इयत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. सिन्नर तालुक्यातील कामगार पाल्यांना शिष्यवृत्तीसाठी 17 लाख 34 हजार, पाठ्यपुस्तकासाठी 3 लाख 64 हजार 171, आजारपणासाठी 9 लाख 15 हजार, एम.एस.सी.आय.टी. प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी 1 लाख 54 हजार 850 एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार्‍या कामगार पाल्यांना कामगार कल्याण मंडळाच्या वतीने 50 हजार शिष्यवृत्ती दिली जाते ती पण शिष्यवृत्ती तालुक्यातील 2 कामगार पाल्यांना लाभ देण्यात आला.

कामगार कल्याण केंद्राच्या वतीने कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी राबविण्यात येणारी प्रत्येक योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने कामकाज केले जात आहे. सिन्नर तालुक्यातील सर्व कामगार पाल्याचे विविध योजनेचे अर्ज मंजूर झालेले असून रक्कम बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. – अनिल बोरसे, केंद्रप्रमुख, कामगार कल्याण केंद्र सिन्नर.

हेही वाचा:

The post नाशिक : 564 कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती; कामगार कल्याण मंडळाची योजना appeared first on पुढारी.