ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं, वय झाले असल्याच्या टिकेला पवारांचे प्रत्युत्तर

शरद पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं अशा शब्दात वय झाले असल्याच्या टिकेवर शरद पवार यांनी आज उत्तर दिले. शरद पवार नाशिकमध्ये असून त्यांची छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात आज सभा आहे. सभेआधी नाशिकमध्ये पवारांनी पत्रकारपरिषद घेत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार यांच्यासह अनेकांनी पवार यांचे वय झाले आहे, त्यांनी आता थांबायला हवे अशी टीका केली होती.  यावेळी त्या टिकेला त्यांनी चांगलच प्रत्युत्तर दिले. यावेळी मंत्रिमंडळात शपथ घेतलेल्यांपैकी अनेक नेत्यांचे वय 70 पेक्षा अधिक असल्याचे पवार म्हणाले. ना टायर्ड हूॅं ना रिटायर्ड हूॅं अशा शब्दात त्यांनी आपल्या वयावरुन करण्यात आलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

स्वातंत्र्याच्या चळवळीत येवल्याचे योगदान होते, त्यामुळे येवल्यातून या महाराष्ट्र दौ-याला सुरुवात केली असल्याचे पवार यावेळी म्हणाले. या पत्रकारपरिषदेनंतर पवार येवला येथे रवाना होणार आहेत.

The post ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं, वय झाले असल्याच्या टिकेला पवारांचे प्रत्युत्तर appeared first on पुढारी.