पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यास सात वर्षे सक्तमजुरी

कारावास www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दीपक वसंत पवार (३२, रा. समर्थनगर, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे.

दीपक याने पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत ३० जुलै २०२० रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. घरातील वस्ताऱ्याने त्याने पत्नीचा गळा कापून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दीपकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक सुनील कासर्ले यांनी करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुधीर कोतवाल यांनी युक्तिवाद केला. साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावे असल्याने जिल्हा व सत्र न्यायालय एन. व्ही. जिवणे यांनी दीपकला पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम. एम. पिंगळे, सहायक उपनिरीक्षक के. के. गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

The post पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यास सात वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.