पिक विम्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत  मुदतवाढ

पिक विमा रक्कम

धुळे : पुढारी वृत्तसेवा

पिका विमा भरतांना अर्ज प्रक्रीया करतांना शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींमुळे पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, त्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा मागणी प्रस्ताव सादर करावा अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी विधानसभेत पाँईंट ऑफ इम्फॉर्मेशनच्या माध्यमातून  केली होती. या मागणीला यश आले आहे. पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ मिळाली असून आता दि. 3 ऑगस्टपर्यंत शेतकर्‍यांना पिक विम्यासाठी आपला अर्ज करता येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

शेतकर्‍यांना आपला पिक विमा भरण्याची 31 जुलैपर्यंत मुदत दिली होती. सदर पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी त्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मागणी करावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी मुंबईत सुरु असलेल्या विधानसभेतील पावसाळी अधिवेशनात (दि.26) जुलै रोजी केली होती. यावेळी मागणी करतांना आ.कुणाल पाटील यांनी पाँईंट ऑफ इम्फॉर्मेशनचा मुद्दा मांडतांना सांगितले होते की, पिका विमा भरण्याची अर्ज प्रक्रीया करतांना शेतकर्‍यांना असंख्य तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सातबारा उतारा काढतांना वारंवार तांत्रिक कारणाने ऑनलाईन साईट बंद होते. तसेच अर्ज भरतांना आधार पडताळणी होत नाही अशा विविध तांत्रिक अडचणी येत असतात त्यामुळे शेतकरी तासन तास ई-सेवा केंद्रावर बसूनही पिक विमा भरण्याची अर्ज प्रक्रीया होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याबाबतची विनंती केंद्र सरकारला करावी. अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली होती. त्यानुसार कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे आणि राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी केली होती. त्यामुळे आज पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ करुन आता शेतकर्‍यांना दि. 3 ऑगस्ट 2023 पर्यंत पिक विमा भरता येणार आहे.

हेही वाचा :

The post पिक विम्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत  मुदतवाढ appeared first on पुढारी.