मुक्ताईनगरात पुन्हा पकडला ३ लाखांचा गुटखा

जळगाव-महाराष्ट्रात प्रतिबंधक असलेला गुटखा मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे येत असताना मुक्ताईनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 लाख 9 हजार 220 रुपयांचा गुटखा व एक कार असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये तंबाखू युक्त गुटख्याला प्रतिबंध घातला आहे व तो विक्रीवर ही प्रतिबंध टाकण्यात आलेला आहे. असे असतानाही जळगाव जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. काही ठिकाणी तर पुण्यात चौकांच्या शेजारीच गुटखा विक्री होत आहे. पोलिसांना माहिती असूनही याबाबत कोणीही मोठ्या प्रमाणात कारवाई करताना दिसून येत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असून मोठ्या प्रमाणातही बाहेर राजस्थान मध्य प्रदेश व गुजरात या भागातून गुटखा मोठ्या संख्येने येत आहे. असेच गुरुवारी सायंकाळी मध्य प्रदेश मधून जळगाव जिल्ह्यात एका कारमधून गुटखा येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या संबधित कार मुक्ताईनगर मधील परिवर्तन चौकात आली असता पोलिसांनी तिला थांबवली व तिची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. कारमधून ३ लाख ९ हजार 220 रुपयांचा गुटखा व 5 लाख 20 हजारांची कार असे एकूण ८ लाख २९ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर शेख अबिद शेख जहीर (वय ३०, रा. राजघाट, काली मशिदजवळ, बऱ्हाणपूर) याला अटक केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post मुक्ताईनगरात पुन्हा पकडला ३ लाखांचा गुटखा appeared first on पुढारी.