युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

राष्ट्रीय युवा महोत्सव www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महोत्सवासाठी विविध प्रकारच्या २२ समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या कामकाजाचा आढावा मंगळवारी (दि. ९) झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेत उपसमित्यांच्या प्रमुखांची बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपस्थित होते. महोत्सवासाठी स्वागत, भोजन, व्हीव्हीआयपी प्रोटोकॉल, प्रसारमाध्यम, नोंदणी, वाहतूक, रहिवास तसेच भोजनव्यवस्था, युवा पुरस्कार, सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षिसे-प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हे यासह विविध प्रकारच्या २२ समित्या महोत्सवाच्या आयोजनात गुंतल्या आहेत. या सर्व समित्यांच्या प्रमुखांशी बैठकीत चर्चा करण्यात आली. दिवसे यांनी ५ ते १० मिनिटांमध्ये प्रत्येक समितीची कार्य, आतापर्यंत केलेली तयारी व नियोजन आदींचा आढावा जाणून घेतला.

चार दिवसीय महोत्सवाअंतर्गत उद‌्घाटन सोहळ्याला पंतप्रधानांसह व्हीव्हीआयपींचा राबता असेल. तसेच महोत्सवाकरिता परराज्यातून रेल्वे व रस्तामार्गे बहुतांश युवक शहरात दाखल होणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिवसे यांनी केल्या. यावेळी महसूल, पोलिस, महापालिका, जिल्हा परिषदेसह अन्य विभागांचे अधिकारी हजर होते.

हेही वाचा :

The post युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.