रसवंतिगृहांसाठी नाशिक शहरात २५ जागा निश्चित

रसवंतीगृह,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महापालिकेच्या वतीने शहरात रसवंतिगृहाच्या उभारणीची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही रसवंतिगृहांकरिता शहरात २५ जागा निश्चित करण्यात आल्या असून, या जागांचे लिलावाद्वारे वाटप केले जाणार आहे. यासंदर्भातील लिलावाची सूचना महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या ३ जानेवारीला विभागीय कार्यालयस्तरावर रसवंतिगृहांच्या जागेकरिता लिलाव होणार आहेत. प्रतिसाद न मिळाल्यास ५ जानेवारीला फेरलिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

रसवंतिगृहांसाठी पूर्व विभागात इंदिरानगर येथील साईनाथनगर चौफुली तसेच पश्चिम विभागात गोल्फ क्लब मैदान, गोरेराम मंदिर पायरीलगत, संदीप हॉटेलसमोरील खुली जागा, त्र्यंबक रोड येथील पंचायत समितीच्या भिंतीलगतची जागा, पंचवटी विभागात अमृतधाम येथील अग्निशमन दल कंपाउंडलगतची जागा, पेठ रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीची खुली जागा, सिटीलिंक बसडेपोलगत, अहिल्यादेवी होळकर पुलाखालील सुलभ शौचालयाच्या बाजूची मोकळी जागा, सातपूर विभागीय कार्यालयाचे हद्दीतील सातपूर विभागीय कार्यालयासमोर, अशोकनगर बसस्टॉप, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कंपाउंडलगत, कुक्कुटपालन केंद्राच्या भिंतीलगत, सातपूर-अंबड-लिंक रोडवरील दत्तमंदिर रोड कॉर्नर, सातपूर गावातील खंडेराव मंदिर, मांगल्य पेट्रोलपंप, मोतीवाला कॉलेजसमोर, बारदान फाटा, सिडको विभागीय कार्यालयाच्या हद्दीतील अंबडगाव महापालिकेच्या शाळेजवळ, पाथर्डीफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गोविंदनगरलगतची मोकळी जागा, नाशिकरोड विभागात गाडेकर मळा, जॉगिंग ट्रॅक मुख्य प्रवेशद्वाराजवळ, जेलरोड येथील नाट्यगृहाच्या आरक्षित खुल्या जागा, बिटको चौकातील उड्डाणपुलाखालील महापालिकेची जागा, आनंद भवन समोरील टेम्पो स्टॅन्डलगत, सोमानी उद्यान या ठिकाणी रसवंतिगृहासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post रसवंतिगृहांसाठी नाशिक शहरात २५ जागा निश्चित appeared first on पुढारी.