राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, अजित पवारांचे पक्षांतर अटळ : गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगाव : राष्ट्रवादीत सध्या ढगाळ वातावरण झाले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार, या नुसत्या चर्चा नाही, तर अजित पवारांचे पक्षांतर हे देखील अटळ असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले,  अजित पवार आता थांबणार नाही असे मला वाटते. ते डॅशिंग नेते आहेत, ते नॉटरिचेबल वाले नेता नाहीत. राज्यातील शिवसेना व भाजपच्या सरकारमध्ये अजित पवारंचा गट आल्यास आगामी काळात चित्र बदलेल. अजित पवार यांच्या पक्षांतराच्या नुसत्या चर्चा नसून या सर्व चर्चांमध्ये तथ्य असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

केवळ राजकीय भूकंपच नाही तर महाभूकंप होईल असा दावाच गुलाबराव पाटील यांनी केला आहे. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांनाही टोला लगावला. शरद पवार जरी या केवळ चर्चा असल्याचे सांगत असले तरी देखील त्यात तथ्य नाही. आजवर शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्धच नेहमी घडत आले आहे. शरद पवार यांच्या बोलण्यावर विश्वास तरी कोण ठेवतं? असा सवालच गुलाबराव पाटलांनी उपस्थित केला.

अजित पवारांसोबत किती आमदार जाऊ शकता असे विचारले असता  अजित पवार यांच्यासोबत साधारण ४० आमदार जातील असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही वाचा : 

The post राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, अजित पवारांचे पक्षांतर अटळ : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.