लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले

कांदा भाव

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू करावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केल्यानंतर आज (दि.24) पासून बाजार समित्यांचे कामकाज पुन्हा सुरु झाले. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये देखील सकाळपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरु झाले. मात्र, सुरु झालेले लिलाव दोन तासांत बंद पडले. कमी भाव मिळत असल्याने शेतक-यांनी लिलाव बंद पाडले. 

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या शुल्कामुळे शेतकरी संतप्त झाले होते. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्या बंद होत्या. त्यानंतर केंद्र सरकार नाफेड मार्फत 2410 प्रतिक्विंटल भावाने 2 लाख मेट्रिक टन इतका कांदा खरेदी करेल अशी घोषणा सरकारने केली. मात्र, तरीही कांद्याला कमी भाव मिळत असल्याने संतप्त शेतक-यांनी पुन्हा लिलाव बंद पाडले,  कांद्याला किमान तीस ते चाळीस रुपये भाव मिळावा. निर्यात शुल्क शून्य करावं अशी मागणी शेतकरी करीत आहेत.  

The post लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले appeared first on पुढारी.