लेसर व्हाइटथ्रोट’चा प्रथमच नाशिकमध्ये थांबा

लेसर व्हाटथ्रोटचे खाद्य,www.pudhari.news

नाशिक : आनंद बोरा

एका देशातून दुसऱ्या देशात पक्षांची भ्रमंती सुरूच असते. लेसर व्हाइटथ्रोट (Lesser whitethroat) अर्थात छोटा श्वेतकंठी वटवट्या हा पक्षी देखील इग्लंड ते दक्षिण आफ्रिका असा प्रवास करीत असतो. अवघ्या दहा ग्रॅम वजनाचा हा पक्षी तब्बल १ हजार ७४० मैल प्रवास करून आपले इच्छित स्थळ गाठतो. मात्र, मुक्कामासाठी तो भारतातील गुजरातमध्ये थांबा घेतो, यंदा प्रथमच तो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलमध्ये मुक्कामासाठी थांबल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लेसर व्हाइटथ्रोट (Lesser whitethroat) हा प्रवासी पक्षी समशितोष्ण युरोपमध्ये, नेऋत्य वगळता पश्चिम आणि मध्य पॅलेर्क्टिकमध्ये प्रजनन करतो. त्यासाठी हा पक्षी स्थलांतरी मार्गाने अंदाजे १ हजार ७४० मैलांचा प्रवास करतो. इग्लंड, युरोपमधून तो दक्षिण आफ्रिकेला जाताना भारतात थांबा घेतो. गुजरातमधील भूज जवळील कच्छच्या रानात तो मुक्कामाला पसंती देतो. यंदा मात्र, त्याने गुजरातएेवजी नाशिक जिल्ह्यातील हरसूल भागातील जंगलात मुक्काम ठोकला आहे. सध्या हरसूलमध्ये अनेक स्थलांतरित पक्षांचे आगमन झाले असून, त्यामध्ये लेसर व्हाइटथ्रोट हा पक्षी देखील दिसून येत आहे. वातावरण बदलामुळे या पक्षाने आपल्या मुक्कामाचे स्थान बदलले असल्याचा अंदाज पक्षिमित्रांकडून व्यक्त केला जात आहे.

असे आहे वर्णन (Lesser whitethroat)

राखाडी पाठ, पांढरेशुभ्र अंडरपार्ट्स, डोळ्यात गडद ‘बँडिट मास्क’, राखाडी डोके, पांढरा गळा अशी या पक्षाची ओळख आहे. हा पक्षी किटकभक्षी असून, तो फळे देखील खातो. स्विडिश निसर्गशास्त्रज्ञ कार्ल लिनिअस यांनी १७५८ मध्ये त्यांच्या सिस्टम नेचरच्या दहाव्या आवृत्तीत ‘मोटासिला कुरूका’ या द्विपदी नावाने कमी पांढऱ्या गळ्याचे असे औपचारिक वर्णन केले होते. रोमन कवी जुवेनलने देखील उल्लेख केलेल्या अज्ञात पक्ष्यासाठी विशिष्ट ‘कुरुका’ हा लॅटिन शब्द वापरला होता.

पक्षीमित्रांचा मोर्चा नाशिककडे

लेसर व्हाइटथ्रोट हा पक्षी प्रामुख्याने इग्लंड आणि वेल्समध्ये सखल प्रदेशात प्रजनन करतात. काही पक्षी एप्रिल महिन्यात इग्लंडमध्ये स्थलांतरीत होतात. शरद ऋतुमध्ये पूर्व भूमध्यसागरीय मार्गे आफ्रिकेत येतात. हा पक्षी लिथुआनियापासून इस्त्रायली किनाऱ्यापर्यंत देखील प्रवास करतो. या पक्षाला बघण्यासाठी देशभरातील पक्षिमित्र गुजरातमधील भूज जवळील कच्छच्या रानात येतात. यंदा मात्र हा पक्षी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मुक्कामाला आला आहे.

पक्षाची नेव्हिगेशन क्षमता

लेसर व्हाइटथ्रोट या पक्षात स्थलांतरासाठी होकायंत्राची भावना दर्शविली आहे. कोणती दिशा घ्यायची हे ठरवण्यात आणि उड्डाण करताना ती दिशा कायम ठेवण्यास त्यामुळे तो सक्षम ठरतो. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता आणि दिशा या दोहोंसाठी गृहीत धरलेल्या संवेदनशीलतेच्या दृष्टीने पक्षांची नेव्हिगेशन क्षमता फार पूर्वीपासून समजली गेली आहे. पक्षी पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे निर्माण होणाऱ्या शक्तींबद्दल संवेदनशील असतात. तसेच सूर्य हा एक कंपास आहे, जो पक्षांना त्यांची दिशा शोधण्यास आणि राखण्यास सक्षम करतो. रात्री प्रवास करणारे स्थलांतरित पक्षी देखील दिशानिर्देश करण्यास सक्षम असतात.

लेसर व्हाइटथ्रोटचे खाद्य

प्रजनन काळात हा पक्षी सुरवंट, बीटल, मुंग्या आणि माशा हे किटक खातो. शरद ऋतु आणि हिवाळ्यात तो फळे देखील खातो.

हेही वाचा :

The post लेसर व्हाइटथ्रोट'चा प्रथमच नाशिकमध्ये थांबा appeared first on पुढारी.