लोडशेडींगमुळे शेतकरी त्रस्त

विंचुरी दळवी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिन्नरच्या पच्छिम पट्ट्यात सध्या रब्बीचा हंगाम चालु झाला आहे. शेतकर्‍यांची रब्बी पिकांची पेरणीची लगबग सुरु आहे. अशातच कांदा, बटाटा या पिकांच्या लागवडीची तयारी सुरु आहे. परंतु महावितरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे थ्री फेज सप्लाय बंद करण्यात येतो. गुरुवार ते रविवार चार दिवस दिवसा आठ तास वीज दिली जाते. परंतु आठतासामधील दोन दिवसांपासून साधी चार तास पण वीज दिली जात नाही. शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना विचारणा केली की, ईमरजन्सी लोडशेडींग आहे असे सांगण्यात येते. एकीकडे दुष्काळी परिस्थीती तर दुसरीकडे विहीरींना थोड्याफार प्रमाणात पाणी आहे तर वीज नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

शेतकर्‍यांनी शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. गुरुवार ते रविवार सकाळी 8.35 ला येणारा थ्री फेज सप्लाय संध्याकाळी 4.35 ला बंद करण्यात येतो, परंतु पाच ते दहा मिनिट सप्लाय आला की लगेच बंद करण्यात येतो याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. वेळेत पेरणी झाली नाही तर याचा फटका केलेल्या पिकाच्या उत्पन्नावर बसतो त्यामुळे शेतकरी पूर्णता हतबल झाला आहे. विजवितरणाने लवकरात लवकर यावर काही उपाययोजना करावी अन्यथा शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा विंचुरी दळवी, पांर्ढुली, घोरवड, शीवडा, बेलु, आगसखिंड येथील शेतकर्‍यांनी दिला आहे.

हेही वाचा :

The post लोडशेडींगमुळे शेतकरी त्रस्त appeared first on पुढारी.