विकसित भारत यात्रेतून सव्वादोन लाख नागरिकांना लाभ 

विकसीत भारत यात्रा ,www.pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरात विकसित संकल्प भारत यात्रा अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्वच १५ तालुक्यांमध्ये यासाठी विशेष तयार करण्यात आलेली व्हॅन फिरत असून, नागरिकांना तत्काळ दाखले तयार करून लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय जनजाती दिनाच्या मुहुर्तावर ही मोहीम सुरू करण्यात आली होती. येत्या २४ जानेवारीपर्यंत ही मोहीम सुरू असणार आहे. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील १३८८ ग्रामपंचायतींपैकी ८६६ ग्रामपंचायतींपर्यंत ही मोहीम पोहोचली आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जाऊन विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करत आहे. दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथून १५ नोव्हेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला होता. कृषी, आरोग्य, महसूल यासह इतर विभागांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी असणाऱ्या योजना गावागावांत पोहोचविण्यासाठी विकास यात्रा रथ गावोगावी फिरत आहे. या विकास रथाच्या माध्यमातून गावागावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळत असून, वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठीचे अर्जही भरून घेतले जात आहेत. लाभार्थ्यांच्या केवायसी संदर्भातील तसेच योजनांच्या बाबतीतील अडचणी व शंका यांचे निरसनही जागेवर केले जात आहे. ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

एक लाख लोकांचा संकल्प

विकास रथासोबत असलेल्या अधिकाऱ्यांतर्फे तेथे भेट देणाऱ्या नागरिकांना शपथ देण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख १९ हजार नागरिकांनी विकसित भारताची शपथ घेतली आहे. नागरिकांमध्ये या माध्यमातून जनजागृती होत आहे.

असे आहेत लाभार्थी

आतापर्यंत झालेल्या ग्रामपंचायती : ८६६

एकूण लाभार्थी नागरिक : २ लाख १७ हजार ५८

पुरुषांची संख्या : १ लाख १२ हजार ६१९

महिलांची संख्या : १ लाख १ हाजर ८९५

सुरक्षा विमा : ४ हाजर ५२६

जीवन ज्योती : ३ हजार ३३८

आरोग्य तपासणी : २३ हजार ३५८

क्षयरोग तपासणी : १४ हजार ४७

सिकलसेल तपासणी : ६ हजार ९३०

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : २ हजार ६८७

हेही वाचा :

The post विकसित भारत यात्रेतून सव्वादोन लाख नागरिकांना लाभ  appeared first on पुढारी.