विधानभवन परिसरात झळकले ‘पुढारी’चे वृत्त 

पुढारी'चे वृत्त विधानभवनात झळकले,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिलेल्या आश्वासनाचे वृत्त विधानभवन परिसरात झळकले आहे. आदिवासी आयुक्तालयांतर्गत चार वर्षांपूर्वी कंत्राटी म्हणून भरती करण्यात आलेल्या क्रीडाशिक्षकांची पुनर्नियुक्ती होणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित यांनी दिले होते. या संदर्भातील वृत्त दैनिक ‘पुढारी’ने १६ सप्टेंबर २०२३ च्या अंकात प्रसिद्ध केले होते. संबंधित वृत्त हे नागपूर विधानभवन परिसरात झळकले आहे.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या शाळेमध्ये संगणक, कला, क्रीडा गेल्या 3-4 शैक्षणिक वर्षापासून राज्यभरात सुमारे 1500 कंत्राटी शिक्षक कार्यरत होते. परंतु 2023-24 या शैक्षणिक वर्षात यांना कामावरून कमी करण्यात आले. तेव्हा पूर्वीप्रमाणे कला, क्रीडा, संगणक शिक्षक यांना पुनर्नियुक्ती शासनाने द्यावी, यासाठी कंत्राटी कला, क्रीडा, संगणक कृती समितीतर्फे शुक्रवारी (दि. 15) नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विधानभवन मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ‘पुढारी’चे वृत्त झळकल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा :

The post विधानभवन परिसरात झळकले 'पुढारी'चे वृत्त  appeared first on पुढारी.