शरद पवार एनडीएमध्ये येण्यास इच्छूक होते : छगन भुजबळ

छगन भुजबळ, शरद पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना भाजपप्रणित एनडीएचा भाग व्हायचे होते का, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यानंतर राज्याचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही ते खरे असल्याचे म्हटले आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या एक पाऊल पुढे जात भुजबळ यांनी २०१४ च्या निवडणुकीतही प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीत प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, २ जुलै २०२३ रोजी अजित पवार आणि आमच्या मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत शपथ घेतली. यानंतर १५-१६ जुलै रोजी आम्ही शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्यात सामील होण्याची विनंती केली. यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात भेट झाली. ते म्हणाले की, शरद पवार ५० टक्क्यांपर्यंत तयार होते, मात्र शेवटच्या क्षणी ते नेहमीच टाळाटाळ करतात.

प्रफुल्ल पटेल यांच्या विधानापासून पुढे जाऊन छगन भुजबळ यांनी २०२३ मध्ये ५० टक्के तयार असल्याचे म्हटले आहे. याआधीही त्यांनी एनडीएमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. २०१४ मध्ये त्यांनी हा प्रयत्न केला. भुजबळ म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे कमी आमदार निवडून आले होते आणि आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. तेव्हापासून हा प्रकार सुरू होता. 

हेही वाचा –

The post शरद पवार एनडीएमध्ये येण्यास इच्छूक होते : छगन भुजबळ appeared first on पुढारी.