शासकीय सुट्यांच्या दिवशी मिनी मंत्रालय सुरू राहणार

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ तारखेपासून सुरू होत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक तातडीची माहिती तसेच कागदपत्रे मागवले जातात. त्यांची पूर्तता आणि कामाची विभागणी करण्यासाठी शनिवारच्या शासकीय सुटीच्या दिवशी जिल्हा परिषद सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला आहे.

तसेच विभागप्रमुखांनीही मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्याबाबत आदेश काढले आहेत. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी संबंधित मंत्रालयाचे अधिकारी स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना संपर्क करतात. वास्तविक काहीवेळा सुटी असल्याने उत्तरे मिळत नाहीत, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी शनिवारच्या शासकीय सुट्या रद्द केल्या आहेत.

डिसेंबर महिन्यातील २, ९, १६, २३ आणि ३० या दिवशी शनिवार आहे. या दिवशी जिल्हा परिषदेचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरू राहणार आहे.

हेही वाचा :

The post शासकीय सुट्यांच्या दिवशी मिनी मंत्रालय सुरू राहणार appeared first on पुढारी.