संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ‘या’ महिला पदाधिकारी शिंदे गटात

हर्षदा गायकर,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत आज नाशिक दौ-यावर आहेत. शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. मात्र त्याआधीच शिवसेनेच्या नगरसेविकेचा शिंदे गटात प्रवेश होत असल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे.

सिडको भागातून शिवसेनेच्या उद्दव ठाकरे गटातुन शिंदे गटात प्रवेश सुरुच आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २६ च्या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेविका व युवती सेनेच्या उपजिल्हा अधिकारी हर्षदा गायकर या महिला आघाडी व युवती सेना पदाधिकारी समवेत आज मंगळवारी (दि. १४) सायंकाळी ६ वाजता मुंबईत वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत.

हर्षदा गायकर यांच्यासोबत या महिला पदाधिकारी करणार शिंदे गटात प्रवेश –

कावेरी कैलास अत्रे (विभाग प्रमुख व महिला आघाडी शाखाप्रमुख, शिवअंगणवाडी शहरप्रमुख )

आरती रवींद्र कांगुने (महिला आघाडी उपशाखा प्रमुख)

वैशाली नितीन मंडलिक (महिला आघाडी शाखा प्रमुख)

उमा सुशील चव्हाण (उपशाखा प्रमुख )

शिवसेना युवतीसेना चे पदाधिकारी

प्राची अंकुश पवार ( जिल्हा समन्वयक अधिकारी )

हर्षदा दिनेश दिवटे ( उपमहानगर प्रमुख )

शितल अनिल भवर ( विभाग अधिकारी )

ऐश्र्वर्या चंद्रशेखर कुत्तेकर (उपविभाग अधिकारी )

नेहा राजाराम गायकर (विभाग प्रमुख )

अनुजा सुशील चव्हाण (विभाग प्रमुख )

सीमा अनिल राऊत ( विभाग प्रमुख )

स्नेहा निवृत्ती शिरसाठ (विभाग प्रमुख )

योगिता चंद्रशेखर कुत्तेकर (विभाग प्रमुख )

साक्षी सूरज बोरसे ( विभाग प्रमुख )

कल्याणी पंढरीनाथ लोहकर. (उपविभाग प्रमुख )

बसने मुंबईच्या दिशेने हर्षदा गायकर व महिला पदाधिकारी रवाना झाल्या आहेत.

हेही वाचा : 

 

The post संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच 'या' महिला पदाधिकारी शिंदे गटात appeared first on पुढारी.