संस्कृत विद्यापीठाचे केंद्रासाठी जागेबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र

Sanskrut Vithyapith pudhari.news

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
संस्कृत भाषेचे जतन व्हावे, भाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी यश आले आहे. मुंबईत पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने नाशिक शहरात संस्कृत विद्यापीठाचे केंद्र उभारणीचा निर्णय केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय विभागाने घेतला आहे. केंद्र उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविले आहे. जागा उपलब्ध झाल्यावर विद्यापीठ कॅम्पसमध्ये पायाभूत सुविधांसाठी केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्यातच तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे समजते.

संस्कृत भाषेला देशात आणि देशाबाहेरही अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून संस्कृत भाषा जतन करण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नाही. त्यामुळेच केंद्रीय संस्कृत महाविद्यालय प्रशासनाने नाशिकमध्ये विद्यापीठाचे केंद्र उभारणीचा निर्णय घेतला आहे. यासाठी योग्य आणि विस्तीर्ण जागा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठविले आहे. यातूनच प्रशासनाने शिलापूर शिवारातील सुमारे चाळीस एकर जागेची पाहणीही केलेली आहे. संस्कृत भाषेचे जतन व्हावे, भाषा समृद्ध व्हावी तसेच भाषेचे संवर्धन व्हावे हा विद्यापीठ उभारणीमागचा मुख्य उद्देश आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पारंपरिक भारतीय ज्ञान प्रणालींना प्रोत्साहन देण्यात येणार असून, शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना मिळणार आहे.

हेही वाचा:

The post संस्कृत विद्यापीठाचे केंद्रासाठी जागेबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र appeared first on पुढारी.