सप्तशृंगी गडावर घाटात तब्बल 300 फुट दरीत कोसळली बस

दरीत कोसळली बस

सप्तशृंगीगड (जि. नाशिक) : पुढारी वुत्तसेवा

नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावरील गणतपी घाटात प्रवासी बसला अपघात झाला आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट 300 फूट खोल दरीत खाली कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत.

आज सकाळी 7 वाजता खामगाव डेपो ची (MH 40 AQ 6259) ही बस घाटातून नांदुरी येथे जात असताना हा अपघात झाला. मोढी जि. अमळनेर येथील एक महिला या अपघातात ठार झाली असून 22 जण जखमी आहेत. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्यावतीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींवर नांदुरी व वणी ग्रामिण रूग्‍णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी जखमींची भेट घेत विचारपूस केली. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनीही अपघाताची माहिती घेत रूग्णांना उपचार व सर्व सुविधा पुरविण्यासाठी मदत करण्यासंबधी सुचना केल्या आहेत.

त्या अपघाताची आठवण 

15 वर्षांपूर्वीही अशीच मुंबई येथील खाजगी बसचा अपघात झाला होता. त्या भीषण अपघाताची आठवण ग्रामस्थांना झाली. त्यावेळेस 200 फुट दरीत बस खाली कोसळल्याने 40 भाविकांना आपला प्राण गमावावे लागले होते.

संरक्षक भिंतीच बनल्या मृत्यूचा सापळा 

सप्तशृंगी गडावरील घाटात पावसासह धुके मोठया प्रमाणावर असते. त्यामुळे अपघाताला हे धुके कारण ठरते. यासाठी पाच ते सहा कि.मी वरील घाटात रिफ्लेक्टर बसविणे गरजेचे असून येथील संरक्षण भिंतीचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून त्या मृत्यूचा सापळा बनल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचाआरोप भाविकभक्तांसह ग्रामस्थ करीत आहे.

हेही वाचा : 

The post सप्तशृंगी गडावर घाटात तब्बल 300 फुट दरीत कोसळली बस appeared first on पुढारी.