सेवानिवृत्तीपूर्वीच लेकीचं वडिलांना मोठं गिफ्ट, कलेक्टर होऊनच दाखवलं…

upsc Success Story nashik

लासलगाव वृत्तसेवा – नाशिक येथील जिल्हाधिकारी बंगल्या जवळील कोतवाल पार्क येथे रहिवास करताना नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुंदर असे निसर्गरम्य निवासस्थान नेहमीच पाहून मी देखील एक दिवस जिल्हाधिकारी होणारच हे स्वप्न नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बाळासाहेब शेखर पाटील आणि विद्युलता शेखर पाटील यांच्या कन्या जानव्ही पाटील हिने शालेय अवस्थेत पाहिलं आणि विवाहानंतर जानव्ही सुमेष नवले पाटील यांनी शालेय अवस्थेत जे आकर्षणाने स्वप्न पाहिले तेच ध्येय नजरेसमोर ठेवून अहोरात्र अभ्यास आणि कष्टमय जीवन जगत सोशल मीडियापासून दूर राहून जे आज घवघवीत यश संपादन केले आहे त्याचा इतिहास देखील हा नाशिक जिल्ह्यातील ठरला आहे. (UPSC Success Story)

सुरुवातीला निफाडचे पोलीस उपाधीक्षक म्हणून डॉक्टर बी.जी. शेखर यांनी दरोडेखोरांविरुद्ध धडाकेबाज कारवाई केली. त्यावेळेस निफाड येथे इंग्लिश मीडियम ची सोय नव्हती निफाड येथून काळा पिवळ्या टॅक्सीने कुमारी जानव्हीने 20 किलोमीटरचा प्रवास लासलगाव पर्यंत दररोज करून कलगीधर इंग्लिश मीडियम मध्ये के.जी आणि सिनियर के.जी चे शिक्षण घेतले. एवढ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी साध्या टॅक्सीने शिक्षणासाठी लासलगाव येत होती परंतु कोणतीही ओळख आणि घरी गाडी असताना प्रवासी वाहतूकीचा आधार घेत शिक्षणाचा श्री गणेशा तिने लासलगाव येथे केला. त्यानंतर निफाड येथील शैक्षणिक सोयी अभावी डॉक्टर बी.जी शेखर पाटील यांचा परिवार नाशिक येथे मुलीच्या शिक्षणासाठी स्थलांतरित झाला आणि कुमारी जानव्ही आणि मुलगा आदित्य हे सुरुवातीला सेंट फ्रान्सिस इंग्लिश मीडियम आणि नंतर फ्रावशी अकॅडमी या ठिकाणी शिक्षण घेतले. अकरावी बारावीचे शिक्षण नाशिकच्या एच.पी.टी. सायन्स कॉलेजमध्ये तिने चांगल्या गुणाने या दोन्ही परीक्षा ती उत्तीर्ण झाली .त्यानंतर पुण्याच्या एमआयटी कॉलेजमधून सिव्हील इंजिनिअरिंग मधील पदवी प्राप्त करताना तिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि सन 2020 पासून जिल्हाधिकारी होण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत 145 वा रँक मिळवत आपले कर्तुत्व सिद्ध केले. (UPSC Success Story)

नाशिक जिल्ह्यात विशेषता पोलीस खात्याची उज्वल परंपरा आणि प्रतिमा उंचावण्यात डॉक्टर बी.जी. शेखर यांचे कार्य अवघ्या जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्रात परिचित आहे. ते आपल्या प्रदीर्घ सेवेतून लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वीच आपल्या वडिलांच्या शानदार कारकीर्दीला भारतीय प्रशासन सेवेचे 145 व्या रँकचे मोठे यश प्राप्त करून त्यांची कन्या जानव्ही हिने एक प्रकारे सॅल्युट केला आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. डॉक्टर बी.जी .शेखर व त्यांच्या पत्नी डॉ. विदयुलता शेखर हे अनेक पदव्यांचे मानकरी आहेत. त्यांचे चिरंजीव आदित्य हे देखील एम.टेक असून ते पी एच डी. अध्ययन करीत आहेत. तालुक्यातील चास गावचे सुपुत्र आणि नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बाळासाहेब शेखर पाटील यांच्या कन्या जान्हवी सुमेश नवले पाटील यांनी सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत दुसर्‍यांदा यश मिळविले आहे. त्यांचा देशात ओपन कॅटेगरीमध्ये १४५ वा क्रमांक आला आहे.

नोकरी करता करता दिली परीक्षा UPSC Success Story

जान्हवी शेखर पाटील – नवले पाटील यांचे शिक्षण फ्रावशी ॲकॅडमी येथून झाले आहे. बारावी पर्यत शिक्षण नाशिक येथे झाले. पुण्यातील एमआयटीत सिव्हिल शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी सन २०१६ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांच्या तयारीला सुरुवात केली. सुरुवातील दिल्लीत शिकवणी लावून अभ्यास केला. नंतर पुण्यात घरी राहून त्यांनी स्वयंअध्ययन सुरु ठेवले. सन 2020 मध्ये यूपीएससी परीक्षेमध्ये त्यांनी चांगले यश मिळविले. त्यांची कलेक्टर म्हणून निवड झाली असून त्या दिल्ली येथे सध्या कार्यरत आहेत. नोकरी करता करता त्यांनी पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. त्या देशात 145 क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी हे दैदीप्यमान यश मिळवले आहे.

घरातूनच अनमोल मार्गदर्शन

जान्हवी या माजी खासदार विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांच्या नातसून असून त्यांचे पती सुमेश नवले हे नोविगो या आंतरराष्ट्रीय अमेरिकन आयटी कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर आहेत. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना जान्हवी यांना घरातूनच आई डॉ.विद्युलता (B.E. Elect. PhD) आणि डॉ. बाळासाहेब शेखर पाटील (IPS) यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषद सदस्या तुलसी सचिन भोर, सरपंच अर्चना बारवे, उपसरपंच कविता चासकर, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक बाजीराव बारवे, नानासाहेब बारवे, श्रीकांत शेगर, बन्सी शेगर यांच्यासह ग्रामस्थांनी जान्हवीचे कौतुक केले आहे.

“युपीएससी परीक्षेच्या तयारीचा प्रवास खूप आवाहनात्मक असतो. या प्रवासात मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या कणखर राहणे गरजेचे असते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. परंतु नागरी सेवा परीक्षा द्यायची हे सुरुवातीपासूनच मनाशी पक्के केले होते. वडील आयपीस असल्याने त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. अभ्यासात सातत्य राखल्याने दुसऱ्यांदा यश मिळविता आले,’’ असे जान्हवी सुमेश नवले पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा –