नाशिक : पहाटे दूधाची गाडी आली अन् चोर पळाले

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

चांदवड (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा; चांदवड शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न 4 ते 5 चोरट्यांनी पहाटे 3 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास केला. यावेळी पहाटेच्या सुमारास दूध डेअरीची गाडी आल्याने चोरट्यांनी एटीएममधून पळ काढला. यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. (Nashik News)

या घटनेची माहिती मिळताच चांदवड चे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, पोलीस हवालदार विजय जाधव यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच मनमाडचे पोलीस उपअधीक्षक सोहेल शेख, नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत, चोरट्यांचा मार्ग काढण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी फिंगर प्रिंटचे पथकाने संशयित चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पहाटे दूधाची गाडी आली अन् चोर पळाले appeared first on पुढारी.