स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट देशात दूसरे

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड,www.pudhari.news

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने “स्वच्छ देवळाली, हरित देवळाली’ या आपल्या घोषणेवर सार्थकता दाखवली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२३ मध्ये देशात दुसरा तर राज्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. 7000 पैकी 6826.10 गुण मिळवून देशात दुसरा तर राज्यात पहिला बहुमान मिळाल्याचे बोर्डाचे आरोग्य अधिकारी अमन गुप्ता यांनी सांगितले. (Deolali Cantonment Board)

एकूण ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी देशात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्यांच्या श्रेणीत दुसरे स्थान मिळवले. देवळाली कॅन्टोन्मेंटने २०२३ मध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे. 2020 मध्ये घसरलेला क्रमांक लक्षात घेऊन बोर्ड प्रशासनाने स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबविण्याचे काम केले. २०२३ च्या सर्वेक्षणात चांगली रँक मिळवण्यासाठी संपूर्ण टीमने काम केले. सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने मंडळाच्या सदस्यांनी यशाची शिडी चढवली. स्वच्छतेबाबत रहिवाशांमध्ये जागृती यासारख्या विविध पद्धती राबवल्या.

देशभरात महू कॅन्टोन्मेंट बोर्डाने कॅन्टोन्मेंट श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. शहरांतर्गत, इंदूरने सर्वेक्षणात पाचव्यांदा ‘इंडियाज क्लीनेस्ट सिटी’चा किताब पटकावला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंडे, एसबीएम तांत्रिक सल्लागार शाजेब सय्यद या शिवाय कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्य प्रीतम आढाव यांनीही अधिकारी- कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. (Deolali Cantonment Board )

याचे श्रेय बोर्ड अध्यक्ष, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता आणि शहर स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी समर्पितपणे काम करणार्‍या सर्व स्वच्छता कामगारांना जाते. यापुढेही ही स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करत राहू. – डॉ. राहुल गजभिये, मुख्य कार्यकारी अधिकारी.

देवळाली स्वच्छतेच्या शाश्वत प्रणालीवर लक्ष केंद्रित केले आणि रहिवाशांमध्ये त्याबद्दल जागरुकता निर्माण केली. शहरातील नवीन कचरा पॉइंट विकसित करून घरोघरी कचरा गोळा करणे यामुळे आम्हाला देशात दुसरे स्थान प्राप्त झाले. हे यश टीमवर्कचे आहे. – अमन गुप्ता, आरोग्य अधीक्षक

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड स्वच्छ सर्वेक्षण मध्ये २०२१,२२,२३ महाराष्ट्र राज्यात पाहिला क्रमांक ठेवत देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नाव राज्यात आघाडीवर ठेवले आहे. – शिवराज चव्हाण, अतुल मुंडे आरोग्य निरीक्षक, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड आरोग्य विभाग.

हेही वाचा :

The post स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट देशात दूसरे appeared first on पुढारी.