६२ व्या राज्य नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून ‘रा+धा’ प्रथम

नाट्य स्पर्धा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून नाट्यभारती, इंदौर या संस्थेच्या रा+धा या नाटकाला प्रथम तर महात्मा गांधी विद्यामंदिर, पंचवटी संस्थेच्या चोरीला गेलाय या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक  बिभीषण चवरे यांनी आज (दि.१८) एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नाशिक केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

संक्रमण युवा फाऊंडेशन, नाशिक या संस्थेच्या खेळ मांडियेला या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक श्रीराम जोग (नाटक-रा+धा), द्वितीय पारितोषिक स्वप्नील गायकवाड (नाटक- चोरीला गेलाय), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक-खेळ मांडियेला), द्वितीय पारितोषिक – विनोद राठोड (नाटक-चोरीला गेलाय), नेपथ्य प्रथम पारितोषिक अनिरुध्द किरकिरे (नाटक-रा+धा), द्वितीय पारितोषिक दीपक चव्हाण (नाटक-आपुलाची वाद आपणाशी), रंगभूषा प्रथम पारितोषिक माणिक कानडे (नाटक-युध्दविराम), द्वितीय पारितोषिक ललित कुळकर्णी (नाटक- आपुलाची वाद आपणाशी) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक लक्ष्मी पिंपळे (नाटक-युध्दविराम) व सचिन रहाणे (नाटक-द कॉन्शस), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे श्रृतिका जोग कळमकर (नाटक-रा+धा), अपूर्णा क्षेमकल्याणी (नाटक-खेळ मांडियेला), सुमन शर्मा (नाटक-कुस बदलताना), मानसी स्वप्ना (नाटक-प्रथम पुरुष), मैत्रेयी गायधनी (नाटक-स्मरणार्थ), सुयोग कुळकर्णी (नाटक-मुंबई मान्सुन), भरत कुळकर्णी (नाटक- ही कशानं धुंदी आली), सुशील सुर्वे (नाटक-प्रथम पुरुष), प्रतीक बर्वे (नाटक-चोरीला गेलाय), प्रविण तिवडे (नाटक-आपुलाची वाद आपणाशी)

दि. २० नोव्हेंबर, २०२३ ते १३ डिसेंबर, २०२३ या कालावधीत परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संजय भाकरे, योगेश शुक्ल आणि अर्चना कुबेर यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम व द्वितीय आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

हेही वाचा :

The post ६२ व्या राज्य नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून 'रा+धा' प्रथम appeared first on पुढारी.