महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘आरमाराची प्रतिकृती’

शिवाजी महाराज यांचे आरमार www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा -छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्षे आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात “जाणता राजा” हे महानाटय झाले. जळगाव येथे महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आरमार याचे प्रदर्शन जळगाव येथील इतिहास अभ्यासक महेश माधवराव पवार ज्यांचा मुळ व्यवसाय शेती आहे. त्यांनी आरमार उभे केले आहे. आरामारातील प्रत्येक जहाजाची प्रतिकृती आणि त्याची माहिती लावली आहे. जळगावकरांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारले होते. शिवरायांनी कल्याण, भिवंडी येथे जहाज उभारणीचे कार्य दि. 24 ऑक्टोबर 1657 ला सुरु केले. सुरुवातीला पोर्तुगीजांना त्यांनी या कामासाठी पगारी ठेवले होते. पण ते फार दिवस टिकले नाहीत तेंव्हा कोकणातील स्थानिक लोकांच्या मदतीने शिवरायांनी जहाज बांधणीचे काम पुर्ण केले अशी माहिती महेश पवार यांनी दिली.

छत्रपती शिवरायांनी आरमारात छोट्या जहाजांवर जास्त भर देत मचवा, शिबाड, पाल, गुराब, गलबत, पाटीमार इ. प्रकारची जहाजे बनवुन घेतली होती. त्या सर्वांच्या प्रतिकृती तसेच चोल साम्राज्याच्या जहाजांच्या प्रतिकृती, इंग्रज व पोर्तुगीजांचे जहाज आणि आय.एन.एस विक्रांत यांच्या प्रतिकृती व त्यांचा संपुर्ण इतिहास या प्रदर्शनात दाखवला आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी लोक येत आहेत. हे प्रदर्शन पोलीस कवायत मैदानात आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून आहे.

हेही वाचा :

The post महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'आरमाराची प्रतिकृती' appeared first on पुढारी.