2019 मध्ये दोघांचे तर यंदा ‘स्वीप’ मुळे ५२७ व्यक्तींचे मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सुरगाणा तालुक्यातील अतिटोकावरील गाव असलेल्या मालगव्हाणमध्ये २०१९ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत फक्त २ मतदारांनी मतदान केले होते. यंदा मात्र ७७७ पैकी ५२७ मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले. सर्व उपक्रमांचे फलित म्हणून हा टक्का वाढला असल्याचे सुरगाणा गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगातर्फे मताचा टक्का वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रत्येक घराघरांत जाऊन मतदान करण्यास नागरिकांना उद्युक्त करणे, रॅली काढणे, शाळांमध्ये बैठका घेऊन पालकांमध्ये जागृती केली. ग्रामपंचायत, पंचायत समित्यांमार्फत गृहभेटी उपक्रम राबविला होता. स्वीप सप्ताह राबविण्यात येऊन यात विविध स्पर्धांचे (जसे, चित्रकला, रांगोळी, मेंदी, क्रीडा) आयोजन केले होते. महिला बचत गटाच्या माध्यमातून बचत मेळावे घेऊन घराेघरी जाऊन जनजागृती केली होती. युवक मतदार जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविला गेला होता. त्यामुळे मालगव्हाणमध्ये मतांचा टक्का वाढला.

हेही वाचा: