नाशिकमध्ये १८ जणांना कोरोनाची लागण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत असून, गेल्या आठवडाभरातच शहरातील १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेची झोप उडविणारा ठरला आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय विभागामार्फत युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. विशेषत: रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन ॲन्टिजेन तपासण्या केल्या जात …

The post नाशिकमध्ये १८ जणांना कोरोनाची लागण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १८ जणांना कोरोनाची लागण

शहरात कोरोनाबाधितांचा आकडा पाचवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा आता पाचवर गेला आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने पर्यटनासाठी शहराबाहेर गेलेले नागरिक कोरोनाचे वाहक असण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी अशा पर्यटनवारी करणाऱ्यांवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. सर्दी, खोकला असणाऱ्या रुग्णांनी ॲन्टिजेन चाचणी करून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले …

The post शहरात कोरोनाबाधितांचा आकडा पाचवर appeared first on पुढारी.

Continue Reading शहरात कोरोनाबाधितांचा आकडा पाचवर

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शहरात शिरकाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सिन्नर, त्र्यंबकेश्वरपाठोपाठ नाशिक शहरातही कारोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महात्मानगर परिसरातील दोन महिलांना तर अंबड परिसरातील एका युवकास कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महापालिकेची आरोग्य-वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, रुग्ण आढळलेल्या परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि …

The post कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शहरात शिरकाव appeared first on पुढारी.

Continue Reading कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शहरात शिरकाव

३९ संशयितांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-सरकारच्या अलर्टनंतर कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या तीन दिवसांत ३९ संशयित रुग्णांच्या ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या असून, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाच्या संभाव्य रुग्णांकरिता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ऑक्सिजनसह औषधोपचारांचीही सज्जता करण्यात आली आहे. (Nashik Corona …

The post ३९ संशयितांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह appeared first on पुढारी.

Continue Reading ३९ संशयितांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

बिटको, झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोनाचा विशेष कक्ष सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– कोरोनाविरोधातील लढ्यासाठी नाशिक महानगरपालिका सज्ज झाली आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय तसेच जुन्या नाशकातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोनाचा विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर बिटको रुग्णालयातील मॉलिक्युलर लॅबही सुरू केली आहे. कोरोनाबद्दल लोकांच्या मनात अद्यापही भीती कायम असल्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांनी पहिल्या दिवशी चाचण्यांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. …

The post बिटको, झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोनाचा विशेष कक्ष सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading बिटको, झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोनाचा विशेष कक्ष सुरू

नाशिक शहरात कोरोना संशयितांच्या आजपासून चाचण्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कोरोना संकटाची काळी छाया पुन्हा एकदा गडद होऊ लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेत अलर्ट दिल्यानंतर नाशिक महापालिका कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सज्ज झाली आहे. नाशिकरोड येथील स्व. बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालय व जुन्या नाशकातील झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोना बाधितांसाठी विशेष कक्षाची स्थापना केल्यानंतर …

The post नाशिक शहरात कोरोना संशयितांच्या आजपासून चाचण्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात कोरोना संशयितांच्या आजपासून चाचण्या